मुख्यमंत्री नितीश कुमारच राहणार , भाजपचे स्पष्टीकरण

Nitish Kumar

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Elections) मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने मागील निवडणुकीपेक्षा यंदा जास्त जागा जिंकून आपणच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमार (Nitish Kumar) हे मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मात्र आता या प्रश्नावर पडदा पडला आहे. भाजप (BJP) मोठा पक्ष ठरला तरीही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असे स्पष्टीकरण भाजपच्या नेत्याने दिली आहे.

बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जैस्वाल यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत आधीच स्पष्ट केले आहे. भाजपने आधीपासून नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील हे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र दिलेला शब्द पाळून नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवणार असल्याचे जैस्वाल यांनी सांगितले. सोबतच त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER