प्रताप गडावर शिवप्रतापदिनी होणारी शिवभक्तांची अडवणुक : नितीन शिंदे

सांगली : प्रतापगडावर शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने गर्दी करणार्‍या शिवभक्तांची संख्या रोढावली आहे. याचे कारण म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणापासून पाच ते सहा किलोमीटरवरच प्रशासनांकडून शिवभक्तांची वाहने रोखली जातात. तेथून पुढचे अंतर पायी जा ये करणे अशक्य होते. त्यामुळे अशा प्रकारे शिवभक्तांची आडवणुक होत असेल तरी ती खपवून घेणार नाही, असा ईशारा सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला आहे.

शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने शिवप्रताप भुमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने शिंदे यांनी छत्रपतींच्या आश्वारुढ पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी त्यांच्याबरोबर आदित्य पटवर्धन, गजानन मोरे,अनिकेत खिलारे, ओंकार पवार, प्रथमेश वैद्य, अनिकेत बेळगावे,अभिषेक कुलकर्णी, आकाश काळेल आदी उपस्थित होते.

सांगलीत पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, अफजलखान वधाचा दिवस हा शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. हा कार्यक्रम केवळ शासकीय न राहता, तो शिवभक्तांचा सार्वजनिक उत्सव म्हणून पुढे यावा. या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांनी उपस्थित रहावे, असा नियम करावा, अशी आमची मागणी आहे. या गडाची सद्यस्थिती बघितली तर पुरातत्व खात्याचे या ऐतिहासिक गडाच्या देखभालीकडे दुर्लक्षच झालेले आहे, असे वाटते. ठिकठिकाणी खाद्यपदार्थांच्या खोकी, टपर्‍या दिसत आहेत. काही ठिकाणी पडझड झाली आहे. अफजल खानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण , बांधकाम काढून टाकणे आवश्यक आहे. राज्यात शिवशेनेचे, शिवभक्तांचे सरकार सत्तेवर आलेले आहे.या सरकारकडून शिवभक्तांच्या मागण्या पूर्ण होती,अशी आशा आहे.