‘दादर असो वा लंडन’ मराठी उद्योजकांसाठी राज ठाकरेंचा महाराष्ट्र धर्म

हॉटेल सुरू होताच, राज यांनी पार्सल थेट घरीच पाठवले

nitin sardesai on raj thakare

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन महिन्यांपासून सर्व व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात ब-याच अंशी शिथिलता देण्यात आल्यानंतर काल अनेक ठिकाणी हॉटेल काही अटीश्रथींवर उघडण्यात आलेत.

ठाणे येथेही प्रसिद्ध हॉटेल प्रकाश हे पार्सल देण्याच्या अटीवर उघडण्यात आले. तेव्हा गेले सत्तर दिवस बंद असलेल्या या हॉटेलमधून पहिल्याचदिवशी राज ठाकरे यांनी आपल्या कार्कर्त्यांसाठी पार्सलची ऑर्डर दिली व ते पार्सल सरप्राइजिंगली सर्वांच्या घरी अचानक गेले. यामुळे भारावलेले मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र धर्माविषयी व विदेशात असतानाही राज ठाकरे आपला महाराष्ट्र धर्म कसा जपतात याविषयीची एक आठवण लिहीली आहे.

दादर असो वा लंडन राज ठाकरे महाराष्ट्र धर्म पाळतात. हे सांगताना नितीन सरदेसाई यांनी त्यांची लंडनमधील एक आठवण सांगितली आहे.

नितीन सरदेसाई लिहीतात –

…. महाराष्ट्र धर्म वाढवावा !

‘प्रकाश’ हे दादरच्या मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीतील एक मानाचं पान… लॉकडाऊन दरम्यान मागील ७० दिवस बंद असलेलं हे उपाहारगृह फक्त पार्सल करीता सुरु झालं आणि पहिल्याच दिवशी या उपाहारगृहातून माझ्या घरी पार्सल आलं. आश्चर्य वाटलं… नंतर कळलं की राजसाहेबांनी माझ्यासह त्यांच्या अनेक मित्र व स्नेही यांच्याकडे अशीच पार्सलं पाठवली.

हाच त्यांचा स्वभाव…

हे तर एक उदाहरण झालं, पण अशाच अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. धारगळकर यांची माहीमची ‘प्रसाद बेकरी’ असो, चितळे बंधू असो की रत्नागिरीतले भिडेंचं ‘योजक’ असो. मराठी उद्योजकांकडूनच खरेदी करण्याचा त्यांचा कटाक्ष असतो. बरं, खरेदी ही एवढी की एखादी गाडी फक्त सामानानेच भरून जावी ! परदेशात गेल्यावर सुद्धा जर तिथे एखाद्या मराठी माणसाचे दुकान अथवा व्यवसाय असल्यास ते हटकून त्याच्याकडेच खरेदी करतात.

काही वर्षांपूर्वी आम्ही लंडनमध्ये असताना तिथे वडापावचे हॉटेल सुरु करत असल्याचे काही मराठी तरुणांनी भेटून सांगितले. राजसाहेबांनी आत्मीयतेने त्यांच्याकडून सगळी माहिती आणि त्यांच्या भविष्यातील योजना ऐकून घेतल्या आणि मुंबईत आल्यावर भेटायचे आमंत्रण सुद्धा दिले. एवढेच नव्हे तर जितके दिवस आम्ही लंडनमध्ये होतो तितके दिवस, भेटणाऱ्या प्रत्येकाला आणि नंतरही मुंबईतून लंडनला जाणाऱ्या प्रत्येक मित्राला तिथे जाऊन वडापाव खाण्याचा आदेश वजा आग्रह ते करत होते.

आणि हे सगळं करण्याचा त्यांचा उद्देश मात्र एकच… महाराष्ट्र धर्म वाढवावा !

महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल प्रचंड आत्मीयता असणाऱ्या या नेत्यासोबत मी काम करतोय याचा मला अभिमान आहे !

दरम्यान, 70च्या वगैरे दशकात मुंबईत मराठी माणसाला दर्जाहीन वागणूक मिळत असतानाचे पाहून बाळासाहेब ठाकरे चवथाळून उठले होते व मराठी माणसाच्या हक्कासाठीचा लढा त्यांनी उभारला होता. या लढ्याला मग चळवळीचे रूप आले व याच लढ्याने बाळासाहेब ठाकरे मुंबऊत मराठी माणसासांठी देवदूत ठरले होते. बाळासाबेब ठाकरेंच्या राजकारणाचा पायाच मराठी माणसांच्या मुद्द्यावरच रचला गेला. त्यांच्यानंतर राज ठाकरेंनी आजही मराठी माणसासाठीचा लढा अविरत चालू ठेवला आहे.

आताही परप्रांतिय मजूर त्यांच्या राज्यात परतलेले पाहून आता मराठी माणसांनी या संधीचं सोनं करावं असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं.

मराठी उद्योजक मग तो कोठेही असो राज ठाकरे त्यांनाच प्राधान्य देतात असेच नितीन सरदेसाई यांनीही आपल्या पोस्टमधून सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER