पदोन्नतीबाबतच्या निर्णयाविरोधात नितीन राऊत यांचा आंदोलनाचा इशारा

Nitin Raut

नागपूर :- पदोन्नतीबाबात राज्य सरकारने घेतलेला निर्णय राज्यघटनेच्या तरतुदींचा भंग करणारा आहे. याच्या विरोधात सर्व स्तरांवरून राज्य सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे. सरकारने निर्णय रद्द न केल्यास राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा इशाराही मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला. फडणवीस सरकारच्या काळात मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्यांवर स्थगिती देण्यात आली होता. सुमारे तीन-साडेतीन वर्षांपासून त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला.

परंतु, पदोन्नतीत आरक्षण देण्याचे टाळले. आदेशातील काही अटींवर मागासवर्ग संघटनांनी आक्षेप घेतला. त्यामुळे तीनदा आदेश बदलावा लागला. सरकारने ७ मे रोजी काढलेल्या आदेशात ३३ टक्के जागा राखीव न ठेवता सरसकट सर्व १०० टक्के जागा सेवाज्येष्ठतेच्या आधारे भरण्यास सांगितले. पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यासाठी उपसमिती गठित करण्यात आली. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी परस्पर बैठक घेत सर्व जागा सेवाज्येष्ठतेच्या आधारे भरण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात येते.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री ठाकरे (CM Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदेशाची समीक्षा करावी तसेच त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या. मंगळवारी बैठक होण्याची शक्यता आहे. बैठकीतील निर्णय मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button