
मुंबई :- राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस (Congress) नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे ऊर्जामंत्रिपद जाण्याची चर्चा सध्या सुरू आहे. आज दिल्लीत काँग्रेस नेत्यांची हायकमांडसोबत बैठक होत आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारमध्ये राजकीय उलथापालथ सुरूच आहे. संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा, मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी झाल्यानंतर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नितीन राऊत यांच्याकडील ऊर्जा खात्याची जबाबदारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत आज काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे बैठक होत आहेत. या बैठकीत पक्षनेतृत्व कुठला निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला