ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण

nitin-raut-tested-covid-positive

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona virus) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राजकीय नेत्यांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राऊत यांनी स्वत: ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली.

तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. “मला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन करत आहे. सर्वांनी सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या.” असे ट्विट राऊत यांनी केले.

“मला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन करत आहे. सर्वांनी सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या,” असे ट्विट राऊत यांनी केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER