रुग्ण कमी होत आहे म्हणून सुखावून जाऊ नका, तिसरी लाट दारावर, मास्टर प्लान करा; नितीन राऊतांच्या सूचना

Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाच्या(Corona) रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. पण म्हणून सुखावून जाऊ नका. कोरोनाची तिसरी लाट दारावर आहे. मास्टर प्लान (Master Plan) करा, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत(Nitin Raut) यांनी प्रशासनाला दिल्या. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली काल एका उच्चस्तरीय बैठकीचे  आयोजन करण्यात आले होते .

गेल्या वर्षभरात १७०० बेड्सवरून सुमारे नऊ हजार बेड्स आम्ही निर्माण केले. मोठ्या प्रमाणात कोविड हॉस्पिटलची सुरुवात केली. ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता होईल यासाठी थेट हवाईदलापासून रेल्वेपर्यंत मदत घेतली. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. आरोग्यविषयक मनुष्यबळातही वाढ केली आहे.

वर्षभरात केवळ आरोग्यावर काम सुरू असून नागपूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक दशलक्ष रुग्णसंख्येमागे साधारण बेड, आयसीयू बेड्ससह व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना  मागे सोडले आहे. मात्र तरीही तज्ज्ञ व शास्त्रज्ञांच्या मते येणारी तिसरी लाट ही अतिशय गंभीर असेल. यामध्ये ही यंत्रणादेखील तोकडी पडू शकते. त्यामुळे युद्धस्तरावर कामाला लागा. तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा, असे आदेश नितीन राऊत यांनी बैठकीत दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button