… आता काँग्रेसला विचार करावा लागेल; सोनिया गांधींच्या पत्राचीही उद्धव ठाकरेंनी दखल घेतली नाही!

मुंबई :- पदोन्नतीत आरक्षणावरून (Reservation for promotion) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेस आक्रमक आहे, त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आहे. दीड महिन्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत लिहिलेल्या पत्राचीही मुख्यमत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दखल घेतली नाही, त्यामुळे काँग्रेसला योग्य विचार करावा लागेल, असे काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) म्हणालेत.

ही बातमी पण वाचा : पदोन्नतील आरक्षण रद्द : सरकारमधील घटकांच्या भूमिकांमुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार खंडाजगी ?

मात्र, लगेच नरमाईची भूमिका घेत ते म्हणालेत की, पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत काँग्रेस आग्रही असली तरी सरकारला धोका नाही. सरकार ५ वर्ष चालेल, हा वाद चर्चेतून सोडवला जाईल. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणे म्हणजे मागासवर्गीयांचा विश्वासघात करणे आहे. राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे. तिथेही पदोन्नतीत आरक्षण आहे मग महाराष्ट्रात का लागू करू नये, असा सवाल नितीन राऊत यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर चालते. दीड महिन्यापूर्वी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या हक्काविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले होते. तीन महिन्यातून एकदा महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक घेण्याची सूचना केली होती. सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी लिहिलेल्या पत्राची दखल घेतली जात नसेल तर काँग्रेसला योग्य तो विचार करावा लागेल, असे नितीन राऊत म्हणालेत. पण काँग्रेस नेमके काय करणार हे त्यांनी सांगितले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button