महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सरकार सहजासहजी पडणार नाही ! काँग्रेस नेत्याचा विश्वास

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) वाढतच चालले आहे. कोरोनात राजकारण आणून याची विकेट जाईल त्याची विकेट जाईल हे बंद करा. मध्यप्रदेशात सरकार पाडलं तसं महाराष्ट्राचे सरकार इतक्या सहजासहजी पडणार नाही.

महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात हे सरकार काम करत राहील, असे राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) जवळचे नेते नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले. जोवर आरोप सिद्ध होत नाहीत तोवर कुणी वसुली मंत्री होत नाही. अनिल देशमुखांचं (Anil Deshmukh) प्रकरण आता न्यायालयात आहे.  तेव्हा त्यांना त्यांचं काम करू द्यावं, असं राऊत म्हणाले. लसीवरून राजकारण थांबवा (Maharashtra corona vaccination, ).

सध्या सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. केंद्राने सत्य परिस्थिती सर्वांसमोर ठेवावी. राजकारण करायचं असेल तर सांगावं एकदा की महाराष्ट्रात भाजपचं सरकार नाही.  त्यामुळे आम्ही तुम्हाला लस देणार नाही, सापत्न वागणूक देत आहोत असे म्हणा, असा हल्लाबोल नितीन राऊत यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button