हे सरकर पहाटेचे नाही, उघडपणे शपथ घेऊन स्थापन ; राऊतांचे विरोधकांना खडेबोल

nitin Raut

औरंगाबाद :- गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळणार असल्याची टीका सातत्याने केली जात आहे. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपले मत मांडले .

गुप्त बैठकीचे अनेक सूर असतात, हे सरकार पहाटेच्या अंधारात झालेलं नाही, उघडपणे शपथविधी घेणारं हे सरकार आहे. तिन्ही पक्ष सोबत काम करतील, सरकार पडणार नाही, असा विश्वास राऊत (Nitin Raut) यांनी व्यक्त केला. ते औरंगाबादेत बोलत होते. .

शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) कौतुक केल्यावरुन नितीन राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावेळी नितीन राऊत म्हणाले, “हे सरकर पहाटेचं नाही, तर उघडपणे शफथ घेऊन स्थापन झालं असून ते भक्कमपणे उभं आहे. आम्ही पूर्ण काम करणार, जोरात करणार. आम्ही एक आहोत म्हणून चांगलं काम होत आहे, असे राऊत म्हणाले .

दरम्यान वीजबिलवरही राऊत यांन भाष्य केले. हवे तर सवलत दिली जाईल, मात्र वीजबिल माफ होऊ शकत नाही. सार्वजनिक कंपन्या चालवण्याला पैसे लागतात, त्यामुळं वीज बिल भरावं लागेल, वीज बिल माफ करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे, केंद्र सरकारने मदत केली तर राज्य सरकारही पुढं येईल, असं नितीन राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र आम्हीही भिकारी नाही; नितीन राऊत आक्रामक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button