काँग्रेसमध्ये पुन्हा नाराजीनाट्य; ऊर्जामंत्रिपदावरून नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत वाद

Nitin Raut - Nana Patole

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) अस्तित्वात आल्यापासून जवळपास दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. या काळात महाविकास आघाडीत अनेकदा नाराजीनाट्य असल्याचे उघड झाले होते. त्यातच सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसचे (Congress) मंत्री आपल्याच सहकाऱ्याच्या खात्यावरून कुरघोड्या करताना दिसत होते. आता मात्र काँग्रेसमध्ये नाना पटोले (Nana Patole) विरुद्ध नितीन राऊत (Nitin Raut) असा नवा वाद निर्माण झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.

नाना पटोले यांना विधानसभेच्या अध्यक्षपदावरून प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. त्यामुळे नाना पटोले याना मंत्रिपदाची अपेक्षा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यातही ऊर्जा खाते आपल्याला देण्यात यावे यासाठी पटोलेंनी दिल्लीच्या नेत्यांकडे जोरदार लॉबिंग केल्याची माहिती मिळत आहे. ‘ऊर्जा’ विभागाबाबत नाना पटोले यांनी पण अप्रत्यक्षपणे सूतोवाच केले होते;

पण नाना पटोले यांच्या या मागणीनंतर आता नितीन राऊत नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे. नितीन राऊत यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी तक्रार केल्याची चर्चा होती. त्यावेळी नितीन राऊतांना दिल्ली वारी करावी लागली होती. आपल्या विरोधात प्रदेशाध्यक्षांच्या गटातून वातावरण तापवलं जात असल्याची चर्चा नितीन राऊत गटात सुरू आहे.

तर दुसरीकडे नितीन राऊत यांच्या सरकारी बंगल्यावर केलेल्या कोट्यवधी खर्चावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे पक्षातील एक गट नितीन राऊत यांच्या विरोधात काम करतोय, त्याच वेळी विरोधी पक्षही राऊतांवर आरोप करण्याची संधी सोडत नाही आहे. या सगळ्या प्रकारावरून एकूणच नितीन राऊत अडचणीत आल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, एबीपी माझाशी बोलताना राऊत यांनी त्यांच्या विरोधात कोण बातम्या देत आहे हे पाहिलं पाहिजे असं सांगत असल्या या बातम्यांमुळे आपलं मंत्रिपद जाणार नाही, असंही स्पष्ट केलं.

ही बातमी पण वाचा : नितीन राऊत यांचं ऊर्जामंत्रिपद धोक्यात, दिल्लीत वरिष्ठ पातळीवर बैठक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER