सोलापूर येथील कार्यक्रमात नितीन गडकरी यांना पुन्हा आली भोवळ

Nitin gadkari

सोलापूर : पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिन कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा भोवळ आली. राष्ट्रगीत सुरू असताना त्यांना भोवळ आली; मात्र ते राष्ट्रगीत संपेपर्यंत तसेच उभे राहिले. राष्ट्रगीत संपल्यानंतर त्यांना पेय देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सोलापुरात आले होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले. आगमनानंतर भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्कार स्वीकारून ते सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यक्रमास्थळी पोहचले. कार्यक्रमात राष्ट्रगीताच्या वेळी त्यांना भोवळ आली. राष्ट्रगीत सुरू असताना ते तसेच उभे राहिले. राष्ट्रगीत संपल्यानंतर ते खुर्चीवर बसले. त्यानंतर त्यांना पेय देण्यात आले. तसेच त्यांना औषध देण्यात आले असून ते विश्रांतीसाठी कुलगुरूंच्या निवासस्थानी रवाना झाले असल्याची माहिती आहे.