
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांनी आपल्या कामातून चक्क विश्वविक्रम केला आहे. याबदद्ल माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विशेष शब्दांमध्ये त्यांचे अभिनंदन केले आहे.
दिल्ली- वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या २४ तासांमध्ये झालेल्या कामाने चार विक्रम मोडीत काढले आणि विश्वविक्रमाची नोंद केली आहे. ट्विट करत गडकरी म्हणतात, “पूर्वीपेक्षा अधिक गतीने देशात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही नवीन मानकेच स्थापित करत नाहीत, तर जागतिक विक्रमदेखील मोडीत काढतो.” गडकरी यांनी केलेल्या या विश्वविक्रमाबद्दल त्यांना शुभेच्छा देत फडणवीस यांनी म्हटले की, “आपला देश व मुंबईसाठी ही मोठी उपलब्धी आहे.”
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला