ममतांनी दुखापतीचे राजकारण करून सहानुभूती मिळवू नये – गडकरी

Nitin Gadkari and Mamata Banerjee

कोलकाता :- सध्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची (West Bengal Assembly Elections) रणधुमाळी सुरू झाली असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. त्यातच चार दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर हल्ला झाल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यांच्या पायाला प्लास्टर असलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले होते. आणि याच मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. पश्चिम बंगालच्या जनतेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भावनिक राजकारण समजले आहे. यामुळे ते तृणमूल काँग्रेसच्या बाजूने मतदान करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली.

नंदीग्रामध्ये प्रचारादरम्यान धक्का लागल्याने ममता बॅनर्जी खाली पडल्या होत्या. या दुर्घटनेत त्यांच्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली होती. दुर्घटनेनंतर ममतांना कोलकातामधील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावर मंत्री गडकरी बोलत होते.

ते म्हणाले, ममता बॅनर्जींसोबत जे काही घडले तो एक अपघात होता, असे प्रत्येक जण सांगत आहे. याचे राजकारण केले जाऊ नये. ममता बॅनर्जी आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात जात आहोत. निर्णय स्वीकारून एखाद्याने पुढे जायला हवे.

दरम्यान, गडकरी यांनी एका जनसभेला संबोधित केले. ते म्हणाले, पक्षाने आधीच अबकी बार २०० पार हा नारा दिला आहे आणि भाजप जनतेच्या मताधिकाक्याने आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आपले लक्ष्य पूर्ण करेल. जनता जो काही निर्णय देईल, ते स्वीकारायला हवे. निवडणुकीतील वातावरण वाद निर्माण करून खराब करणे, योग्य नाही. ममता बॅनर्जींसोबत जे घडले ते दुर्दैवीच आहे. मात्र, मी त्यांना विनंती करतो की, त्यांनी याचे राजकारण करू नये. तसेच त्यांनी जनतेला विश्वास दिला की, जर जनतेने त्यांना मताधिक्य दिले, त्यांचा रस्ते व परिवहन मंत्रालय विभाग येत्या दोन वर्षांत मुख्य रेल्वे प्रकल्प पूर्ण करेल. दरम्यान, येत्या २७ मार्चपासून पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीला सुरुवात होत आहे. २९ एप्रिलला शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

ही बातमी पण वाचा : आघाडीत फूट; आता विरोधकांचे नेतृत्व पवारांच्या हातात? ममतांसाठी पवार मैदानात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER