रस्त्यावर २०० वर्ष खड्डा पडणार नाही : गडकरी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे गुरुवारी  चाकूर-माळेगाव-लोहा-वारंगा, नांदेड-उस्माननगर-कंधार-फुलवळ-उदगीर आणि नांदेड-उस्माननगर-हळदा-कौठा-मुखेड-बिदर या तीन राष्ट्रीय महामार्गांचे भूमिपूजन झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे होते.

केंद्र शासनाकडून मराठवाड्यात ५७ हजार ६५१ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून त्यात नांदेड जिल्ह्यातील ८ हजार कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे.

मराठवाड्यातील ही कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील; २०० वर्षे या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज बांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यावेळी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपचे अन्य नेते उपस्थित होते.