‘सामना’च्या धमाका मुलाखतीपूर्वी नितेश राणेंचे ट्विट; उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर टीकास्त्र

Nitesh Rane - Sanjay Raut - Uddhav Thackeray

मुंबई : महाविकासआघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची विशेष मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत आज प्रसारित झाली आहे . यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे कट्टर विरोधक नितेश राणे यांनी एक ट्विट करुन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांना मुलाखत द्यायला हवी होती. ही मुलाखत कंगनाच्या (Kangana Ranaut) कार्यालयात व्हायला पाहिजे होती आणि त्यामध्ये सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावर चर्चा झाला पाहिजे होती. तो खरा धमाका ठरला असता. पण सरतेशेवटी मुलाखत कोणाला द्यायची हा उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे, असे नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमध्ये राणे यांनी संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका करण्यात आली आहे.

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीच्या या मुलाखती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वच मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER