नितेश राणेचा महाविकास आघाडीला धक्का, भाजपाकडे एक ग्रामपंचायत अविरोध

Nitesh Rane

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध झाली. भाजपा (BJP) पुरस्कृत सर्व सदस्य निवडून आलेत. ही सात सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. सदस्यांनी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची भेट घेतली.

मोंडपार ही अविरोध निर्वाचित झालेली जिल्ह्यातील चौथी ग्रामपंचायत आहे. याआधी कणकवली तालुक्यातील गांधीनगर आणि वैभववाडी तालुक्यातील मांगवली या दोन ग्रामपंचायती अविरोध निवडल्या गेल्या आहेत.

सोमवारी निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी देवगड तालुक्यातील रहाटेश्वर आणि मोंडपार या ग्रामपंचायत अविरोध निर्वाचित झाल्या. जिल्ह्यातील चार ग्रामपंचायत अविरोध निवडल्या गेल्या आहेत.

वैभववाडी

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. मात्र वैभववाडीत राजकारण तापू लागले आहे. वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या १०३ जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील २८ ग्रामपंचायत सदस्य भाजपायाचे आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने अविरोध निवडून आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER