
मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्युप्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सीबीआयकडे (CBI) सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य केले आहे. यावर आता भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ‘सामना’च्या या अग्रलेखवरूनच महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) व शिवसेनेला आपल्या ट्विटच्या माध्यमातून लक्ष्य केले आहे.
ही बातमी पण वाचा:- …म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे” : निलेश राणे
आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेख चे विषय :
1.) मराठी अस्मिता
2.) महाराष्ट्र धर्म
3.) मराठी माणूसNight life करताना यांना मराठी माणुस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही..तेव्हा Dino,Jacqueline,disha पाहिजे असतात..वाट लागल्यावर लगेच मराठी माणुस !
— nitesh rane (@NiteshNRane) August 20, 2020
नितेश राणे ट्विटमध्ये म्हणाले की, आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय :
१) मराठी अस्मिता, २) महाराष्ट्र धर्म, ४) मराठी माणूस Night life करताना यांना मराठी माणूस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही… तेव्हा डिनो, जॅकलिन , दिशा पाहिजे असतात… वाट लागल्यावर लगेच मराठी माणूस !” अशी जहरी टीका ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला