
सिंधुदुर्ग :- नितेश राणेंची (Nitesh Rane) केस उघडली तर ते आता तुरुंगात जातील असा दावा शिवसेनेचे (Shiv Sena) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. राऊत म्हणाले, त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुरुंगात टाकणार होते, असा गौप्यस्फोट करतानाच ही केस उघडली तर नितेश राणे तुरुंगात जातील, असा दावा विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
कणकवलीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना खासदार विनायक राऊत यांनी हा गंभीर आरोप केला आहे. नितेश राणेंनी नवी मुंबईत एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातला होता. या प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. या गुन्ह्याप्रकरणी फडणवीस हे नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते. पण नारायण राणे भाजपला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली. आम्ही मनात आणलं तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती एक ओपन झाली तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
राणेंचे मातोश्रीवर फोन करणे –
नारायण राणे (Narayan Rane) दोन महिन्यापूर्वी दिवसातून तीन-तीन वेळा मातोश्रीवर फोन करत होते, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला आहे. राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यापूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. अखेर उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे परवानगी दिली, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, नितेश राणे यांनी अद्याप राऊत यांच्या आरोपाचं खंडन केलेलं नाही. त्यामुळे नितेश राणे नेमकं काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ही बातमी पण वाचा : सुनेत्रा पवार, वरुण सरदेसाईना सुरक्षा मात्र, फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत केली कपात
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला