जेलबाहेर येताच नितेश राणेंचा दीपक केसरकरांना इशारा

Nitesh Rane-Deepak Kesarkar

मुंबई : उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घालणारे काँग्रेस आमदार नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना काल जामीन मंजूर करण्यात आला आहे. जेलबाहेर येताच नितेश राणेंनी शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांना ‘अपना भी टाईम आयेगा’ अशा शब्दांत चेतावणीवजा थेट इशारा दिला आहे.

ही बातमी पण वाचा : श्रीदेवींचा मृत्यू अपघात नव्हे तर खून

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नितेश राणे म्हणाले, ”लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. लोकांची प्रामाणिक सेवा हा आमचा हेतू असतो. आम्ही जनतेस बांधील म्हणूनच ही पावले उचलली. कुणाला मारणे, हल्ला करणे ही आमची संस्कृती नाही. अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले तर अशी आंदोलने होणार नाहीत. जनेतेचे सर्व पर्याय संपतात तेव्हा अशा पद्धतीची आंदोलने, उद्रेक होतात. अधिकाऱ्यांनी ३५३ कलमाचा वापर कवच म्हणून करावा, शस्त्र म्हणून करू नये.”

असे आवाहन नितेश राणे यांनी केले. नितेश राणे यांनी शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांचे उदाहरण देत भाजप आणि शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांनी आमचे आंदोलन योग्य होते, असे सांगितले. आम्ही लोकांची सेवा करीत राहणार. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना नितेश राणे जेलमध्ये बसतानाचा फोटो दाखवा असे स्वप्न पडत होते. मी त्यांना सांगेन की, जिल्ह्याच्या उन्नतीचे स्वप्न पाहा. मी केसरकरांना एवढंच सांगेन अपना भी टाईम आयेगा, असं नितेश राणे म्हणाले.