नितेश राणे-वरुण सरदेसाई वाद पेटला; भाजप कार्यालयात मोकाट कुत्री सोडण्याचा युवा सेनेचा प्रयत्न

Yuva Sena Maharashtra Today

मुंबई :- शिवसेना (Shiv Sena) नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) आणि भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. यावरून नाशिकमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होताना दिसले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर अक्षरश: राडा घातला. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात मोकाट कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला. तसेच नारायण राणे (Narayan Rane), नितेश राणे आणि निलेश राणे (Nilesh Rane) यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही केली.

या सगळ्या प्रकारामुळे नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवले. आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांचे पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याशी आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप केला होता.

ही बातमी पण वाचा : मला नोटीस पाठवलीत तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन ; नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER