‘कंगना तो एक बहाना है’,’बेबी पेंग्विन को बचाना है’ : नितेश राणे

Nitesh Rane-kangna-ranaut

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगणा राणावतने (Kangana Ranaut) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे . या पार्श्वभूमीवर कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक सूचक टि्वट केले आहे.

नितेश राणे यांनी शायरीच्या अंदाजात टि्वट करुन निशाणा साधला आहे. “कंगना तर फक्त एक कारण आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या प्रकरणावरुन लक्ष हटवायचे आहे. बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही” असे नितेश राणे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आली आहे. तिन ट्विटरवरून देखील विविध व्यक्तींवर टीका करण्याची संधी सोडली नाही आहे. दरम्यान कंगनाने नुकतेच ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’ असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER