एकदाच धूर निघाला पाहिजे… हर हर महादेव ! नितेश राणे संतापले

Nitesh Rane

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Mahharaj)यांच्या नावाने बिडी उत्पादन करणाऱ्या पुण्यातील कंपनीविरोधात आवाज उठविण्यात येत आहे . संभाजी बिडी नावानं पुण्यातील कंपनी बिडी (Bidi Company) उत्पादन करते. या कंपनीकडून वापरल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला यापूर्वीही विरोध झालेला आहे. आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हा मुद्दा उपस्थित करत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर थांबवण्याची मागणी केली. आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे

“संभाजी राजेंच्या नाव बिडी ला देण्याचे धाडस आपल्या महाराष्ट्रात होते इथेच आपण कमी पडलो! यांची आताच हिम्मत मोडली नाही तर उद्या अजुन वाढेल. एकदाच धूर निघाला पाहिजे. हर हर महादेव !!!,”असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘कंगनासारखे ‘उपरे’ आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन, पटानी अस्सल मराठी!’ नितेश राणेंचा शिवसेनेला टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER