या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीने खून केला, नितेश राणेंची टीका

Nitesh Rane slams thackeray govt over Maratha reservation

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द केलं असून गायकवाड समितीच्या शिफारशीही फेटाळल्या आहेत. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे एसीबीसीच्या नावाखाली देण्यात आलेलं आरक्षण आम्ही रद्द करत आहोत, असं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतांना दिसत आहे. मराठा समाजाचे नेते राज्य सरकारविरोधात संतप्त झाले असून, विरोधीपक्ष असलेल्या भाजपनेही ‘ठाकरे’ सरकारची (Thackeray Govt) कोंडी करण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणचा नियोजित पद्धतीने खून केला, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीने खून केला आहे. सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे. कसली तयारी नाही, फक्त नाटक आणि ढोंगीपणा सुरू आहे. शेवटी छ. शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे. तोंड वाजवून न्याय भेटत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button