हिसाब होगा, इंटरेस्ट लगाके ; अर्णव गोस्वामीच्या अटकेनंतर नितेश राणेंचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

Nitesh Rane-Arnab Goswami-CM Thackeray

मुंबई :- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab-Goswami) यांना रायगड पोलिसांनी अटक केल्यानंतर ठाकरे सरकारवर विरोधकांकडून टीकास्त्र सोडण्यात येत आहे . अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गोस्वामींना बेड्या ठोकल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी “हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगाके, असे ट्वीट करत ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

ही बातमी पण वाचा : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

सत्ता आज है, कल नही… आज तुम्हारी है… कल हमारी होगी.. बस इतना याद रखना… हिसाब तो होगा.. इंटरेस्ट लगा के” (सत्ता आज आहे, उद्या नसेल… आज तुमची आहे… उद्या आमची असेल.. फक्त इतकंच लक्षात ठेवा, हिशेब होणार.. व्याजासकट) असं ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे. या ट्वीटमध्ये नितेश राणेंनी कोणालाही मेन्शन केलेलं नाही, किंवा कोणाचं नावही घेतलेलं नाही. मात्र अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर अवघ्या काही मिनिटांत हे ट्वीट केल्याने यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER