नितेश राणेंनी शिवसेनेला तोंडघशी पाडले, काका राणेंच्या सेना प्रवेशानंतरही जानवलीची सत्ता भाजपकडे

Nitesh Rane - Vaibhav Naik

कणकवली : जानवली गावचे प्रभारी सरपंच काका राणे (Kaka Rane) आणि अमोल राणे (Amol Rane) यांचा कार्यकर्त्यासह काल शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. सरपंच निवडणुकीच्या आदल्या दिवशीच शिवसेनेत प्रवेश घेऊन कणकवलीचे आमदार नितेश राणेंना त्यांच्याच होमपीचवर जोरदार धक्का दिला होता. मात्र या प्रवेशाला २४ तास होत नाहीत तोच आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) शिवसेनेचे मनसुबे उधळून लावत तोंडघशी पाडले. वैभव नाईक यांच्यावर पलटवार करत नितेश राणे यांनी जानवली ग्रामपंचायतीवर भाजपची (BJP) सत्ता खेचून आणली. .

सरपंच निवडीच्या पूर्वसंध्येलाच जानवलीतील राजकीय हालचालींनी वेग धरला होता. सरपंचपदाच्या या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र भाजपच्या शुभदा राजेश रावराणे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. तर पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांचे कणकवलीत वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.

सरपंचपदाच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी शिवसेनेने प्रभारी सरपंच भाजपचे काका राणे यांना शिवसेनेत प्रवेश दिला होता, मात्र प्रत्यक्षात सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊन भाजपच्या शुभदा रावराणे या सरपंचपदी विराजमान झाल्या. जानवली ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या सरपंच निवडीसाठीच्या विशेष बैठकीत शुभदा रावराणे या बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी पी. डी. पालकर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button