कलानगरचे साहेब अनिल परबांना म्हणाले, ‘तू तुझं बघून घे’, नितेश राणेंचा गौप्यस्फोट

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्य परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परब यांनी शासनाची फसवणूक करून मुरुड येथे १० कोटी रुपयांचे बेकायदेशीर रिसॉर्ट बांधले आहे. त्यामुळे परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. आपला बचाव करावा या मागणीसाठी अनिल परब कलानगरच्या साहेबांकडे गेले होते.

मात्र साहेबांनी आपले हात वर करत अनिल परबांना ‘तू तुझं बघून घे’ असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितल्याचा दावा राणे यांनी केला आहे. विशेष म्हणजे राणेंनी कोकणी भाषेत केलेल्या या ट्विटमुळे राजकीय चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. ‘मला सोमय्यांपासून वाचवा’ अशी आर्त हाक मारत आमचे हरकुळचे परब कलानगरच्या साहेबांकडे गेले होते. मात्र तू तुझं बघून घे, असे  कलानगरच्या साहेबांनी परबांना ठणकावून सांगितले आहे. आता अनिल परब यांना कळलं असेल आम्ही काय म्हणत होतो. आता तुमचे स्वागत आहे, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणेंनी केलेल्या या ट्विटमुळे अनिल परब यांच्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, अनिल परब व सचिन वाझेचे संबंध आहेत. त्याबाबत एनआयए व सीबीआयकडे आपण तक्रार केलेली आहे. वाझेने दिलेले पैसेच या रिसॉर्टसाठी वापरले गेले आहेत. त्यामुळे परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. याबाबत आपण राज्यपालकांकडेही तक्रार केली आहे. त्यांनी एसआयटी चौकशी करावी, अशी सूचना राज्य सरकारला केली आहे. ही जागा शेतजमीन असल्याचा व त्यावर मागील दीड वर्षात बांधकाम झाल्याचे गूगल मॅपचे पुरावे आपल्याकडे आहेत. याबाबत राज्य शासनाने कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार आहे, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button