‘उद्या अब्रू घालवण्यापेक्षा आजच राजीनामा देऊन टाका’, नितेश राणेंचा अनिल परबांना टोला

Anil Parab-Nitesh Rane

मुंबई :- नाशिक येथील निलंबित मोटार वाहननिरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या लेटरबॉम्बमुळे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नागपूर (Nagpur) येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे आरोपांच्या केंद्रस्थानी असून, त्यांच्यामार्फत कोट्यवधी रुपये अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात येतात. प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) जातीनिहाय वसुली आणि पोस्टिंग सुरू आहेत, असे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत परब यांच्यावर निशाणा साधला आहे. अहो अनिल परबजी आजच मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाका, उद्या उगीच अब्रू जायला नको. आजची उरलीसुरली लाज वाचवा, ऐकताय ना? असे म्हणत नितेश राणे यांनी अनिल परब यांना खोचक टोला लगावला.

दरम्यान, गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या परिवहन अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी, परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह थेट ‘मातोश्री कनेक्शन’चा उल्लेख लेटरबॉम्बमध्ये केला आहे. त्यामुळे ‘मातोश्री’ची बदनामी थांबविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वेळीच पावले उचलावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे. दुसरीकडे, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीदेखील अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button