मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत? नितेश राणेंचा सवाल

Nitesh Rane-CM Uddhva Thackeray

मुंबई :- भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आज मुख्यमंत्री पंचनामे करण्याचे आदेश देतात मग ते पंचनामे रद्दी भरण्यासाठी ठेवले आहेत का ? अधिकारी पर्यटनासाठी गावागावात फिरतात का? मुख्यमंत्री कोकणात (Konkan tour) येऊन काय दिवे लावणार आहेत, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांचा तौक्ते चक्रीवादळाच्या (Tauktae Cyclone) पार्श्वभूमीवरचा कोकण दौरा म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळं कसं छान सुंदर आहे हे दाखवले जाते आणि तोंड धुतल्यावर सगळं निघून जाते, तसा हा प्रकार असल्याचं नितेश राणे म्हणाले.

ठाकरेंचा कोकण दौरा फोटोसेशनसाठी आहे. फोटोग्राफरने फोटो काढायचे असतात, स्वतःचे फोटो काढून घ्यायचे नसतात…जर ते फोटो काढून घेण्यासाठी येत असतील ते काम त्यांनी घरी बसूनच करावं…इथे यायची गरज काय ? इथे येतच असाल तर राज्याच्या जनतेच्या दिलसासाठी पॅकेज जाहीर करतात..निसर्ग चक्तीवादळाची, तौक्ते चक्रीवादळाची मदत द्या, असे नितेश राणेंनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय ; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button