मला नोटीस पाठवलीत तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन ; नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना इशारा

Varun Sardesai AND Nitesh Rane

मुंबई :- सचिन वाझे (Sachin Waze) यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर आणल्यानंतर वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी आम्हाला नोटीस पाठवायची धमकी दिली. मात्र, त्यांनी नोटीस पाठवली तर आम्ही शिवसेनेची (Shivsena) अनेक प्रकरणं बाहेर काढू, असा इशारा भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला.

आम्ही 39 वर्षे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल तर मग आम्हीदेखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढू का? ही माहिती बाहेर आली तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही, असे नितेश राणे यांनी सांगितले.

राणे यांनी सोमवारी वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांचे सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी पत्रकारपरिषद घेत नितेश राणेंवर पलटवार केला होता. तसेच नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन, असेही वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते.

ही बातमी पण वाचा : जळगावात अखेर ‘सांगली पॅटर्न’ ; शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER