..तर तुमचे मालक घरात महायज्ञ कशासाठी करतायेत?, नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला

मुंबई : तिन्ही पक्षांच्या अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi govt) सरकारमध्ये शिवसेना नाराज आहे, या फक्त आणि फक्त अफवा आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवण्याची कुणालाही गरज नाही. महाविकास आघाडी सरकार आज पडेल उद्या पडेल अशा स्वप्नात कोणी राहू नये. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचा ठाकरे सरकारला पूर्णपणे आशीर्वाद असून ‘ठाकरे’ सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला होता. त्यावर आता भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) शेलक्या शब्दात टोला हाणला.

महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर, ‘राऊत साहेब तुमचे मालक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात ५ तास बसून कशासाठी महायज्ञ करतायेत?

राजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी, अशा शेलक्या शब्दात नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button