दिशासोबत जे झालं तेच पूजासोबत होणार असेल तर ‘शक्ती कायदा’ चाटायचाय?; नितेश राणेंचा संताप अनावर

मुंबई :- परळी येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीने पुण्यात आपले जीवन संपवले. तिच्या मृत्यूनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तरुणीने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील एका मंत्र्यांचं नाव या प्रकरणात जोडलं जात आहे. विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असून त्यातूनच तीने आपले जीवन संपवल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. तर राज्य सरकारडून आणलेला शक्ती कायदा महिलांचे संरक्षण करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘जे दिशा बरोबर झाले.. तेच पुजा बरोबर होणार असेल. तर तो शक्ती कायदा.. काय चाटायचा आम्ही? असा सवाल राणे यांनी ट्वीट करत केला आहे.

ही बातमी पण वाचा : मंत्री राठोडांवरील आरोपानंतर मुख्यमंत्री इन अ‌ॅक्शन ; कोणत्याही क्षणी कारवाई?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER