
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी १० वाजतापासून सुरू झाली आहे. कोकणात भाजपाला (BJP) चांगले यश मिळाले; पण महाआघाडीचे नेते त्यांना यश मिळाल्याचा दावा करत आहेत. यावर कोकणात भाजपाला मिळालेल्या यशाची आकडेवारी देत भाजपाचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपरोधक ट्विट केले – …भाजपाला अशीच पी छाडी कायम राहू दे!
“देवगड २३ पैकी १८, वैभववाडी १२ पैकी ९, कणकवली ३ पैकी १, मालवण ६ पैकी ५, कुडाळ ८ पैकी ४ ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. तरीदेखील सिंधुदुर्गात भाजपा पीछाडीवर म्हणत असाल तर भाजपा पीछाडीवरच अशीच पीछाडी कायम राहू दे!” असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
देवगड २३ पैकी १८
वैभववाडी १२ पैकी ९
कणकवली ३ पैकी १
मालवण ६ पैकी ५
कुडाळ ८ पैकी ४तरीपण सिंधुदुर्गात भाजप पिछाडीवर म्हणत असाल तर भाजप पिछाडीवरच अशीच पिछाडी कायम राहूदे!
😊😊😊— nitesh rane (@NiteshNRane) January 18, 2021
भाजपाने केली कणकवलीची परतफेड
कोकणामधील कणकवली तालुक्यात शिवसेनेने भाजपाला म्हणजेच राणे कुटुंबाला धक्का दिला, त्याची परतफेड भाजपाने मालवणमध्ये केली. मालवणमधील ६ पैकी ५ ग्रामपंचायतींवर कमळ फुलले ! मालवणमधील हा पराभव शिवसेनेसोबत शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला