राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही आणि…”; नितेश राणे

Nitesh Rane

मुंबई :  कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निकालाच्या माध्यमातून राणे कुटुंबाला शिवसेनेने (Shivsena) पाहिला धक्का दिल्यानंतर राणे कुटुंबाला शिवसेनेचा धक्का या अर्थाने बातम्या फिरु लागल्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सर्वाधिक जागा भाजपानेच जिंकल्याचा दावा केला आहे. इतकचं नाही तर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणेंनी राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही असंही म्हटलं आहे. कोणत्याही नेत्याचं नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली आहे.

आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीचे प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात झाली. कोकणामधील कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निकालाच्या माध्यमातून राणे कुटुंबाला शिवसेनेने पाहिला धक्का दिला. भाजपा आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांना धक्का देत सिंधुदुर्ग तालुक्यातील कणकवलीमधील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER