‘सबका टाइम आयेगा’, कंगना रणौतच्या कार्यालयावरील कारवाईनंतर नितेश राणेंचे ट्विट

Kangana Ranaut

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोड चालवल्यानंतर अनेक राजकीय नेते यावर भाष्य करीत आहेत .कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईनंतर मुंबई महापालिकेवर निशाणा साधला .

ही बातमी पण वाचा:- कांगांच्या समर्थनार्थ  सोशल मीडियावर  ‘वेलकम टू मुंबई’ ‘ट्रेंडिंग’

“कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, सर्वांनाच सारखा कायदा लागू होतो, अशी अपेक्षा आहे. महापालिकेची टीम आता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर जाणार का? निश्चितच नाही…एवढी हिम्मत ते कशी दाखवू शकतात. सबका टाइम आयेगा !! असे नितेश राणे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे वादंग पेटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER