संभाजीनगर न बोलता औरंगाबाद म्हटलं की त्यांना चपलेनं मारायचं; आदित्य ठाकरेंचा जूना व्हिडिओ शेअर करत राणेंचा टोला

Nitesh Rane on Aditya Thackeray

मुंबई:औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. त्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, आमचा त्यास विरोध असल्याचं ठामपणे सांगितलं. त्यामुळे विरोधी पक्षांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची सुरुवात केली आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत टोला लगावला आहे.

नितेश राणे यांनी ट्विटवर आदित्य ठाकरेंचा औरंगाबादमधील भाषणाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आदित्य ठाकरेंनी औरंगाबादच्या नामांतराबाबत भाष्य केलं आहे. ”काँग्रेस- राष्ट्रवादीच्या लोकांनी संभाजीनगर न बोलता औरंगाबाद म्हटलं की त्यांना चपलेनं मारायचं. त्यांना शेण खायायची सवय आहे, असं आदित्य ठाकरे व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER