नितेश राणे यांनी केली मराठा आंदोलकांची झोपण्याची व्यवस्था

Nitesh Rane

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर जवळपास महिनाभरापासून आंदोलन करत असलेल्या मराठा आंदोलकांवर रस्त्यावर झोपण्याची वेळ आल्यामुळे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काळा चौकीतील कमलाबाई मोरे सभागृहात त्यांच्या राहण्याची सोय केली आहे.

गेल्या २५ दिवसांपासून मराठा आंदोलक आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असून हा त्यांच्यावर अन्याय आहे. एका वृत्तवाहिनीवर या आंदोलकांवर रस्त्यावर झोपण्याची वेळ आल्याचे दिसून आल्याने मी स्वत: पुढाकार घेऊन त्यांची व्यवस्था सुरक्षित स्थळी केली असल्याचे राणे म्हणाले. आपण या सरकारचा निषेध करत असल्याचे राणे म्हणाले.