
सिंधुदुर्ग :- नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु आहेत. नाणारवर घेतलेल्या भूमिकेवरुन शिवसेना (Shivsena) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांना पक्षात त्रास होत असेल, तर त्यांनी भाजपमध्ये यावं, आम्ही त्यांना निवडून आणू, असे खुले निमंत्रण भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले आहे.
ही बातमी पण वाचा : …यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिले पाहिजे : निलेश राणे
कोकणात पुन्हा एकदा नाणारच्या मुद्द्यावरुन राजकीय स्तरावर वाद रंगला आहे. ज्या ठिकाणी नाणार प्रकल्प होणार आहे, त्या राजापूरमधील शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पाबाबत काल अचानक जाहीर केलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत. राजन साळवी यांना ही भूमिका महाग पडणार, याची चर्चा होती. अशातच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाचा मुद्दा संपला, असा पुनरुच्चार करुन साळवींना टोला लगावला.
दरम्यान शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापूर आणि नाणार प्रकल्पाला लोकांचे समर्थन असेल, तर विचार करु असं म्हटल्यानंतर मागून आलेल्या शिवसैनिकांनी त्यांना फटकारले. ही इज्जत एका निष्ठावंत शिवसैनिकाला आजच्या शिवसेनेमध्ये मिळते. ज्याच्याकडे गांधीजी तोच खरा शिवसैनिक हे आज शिवसेनेत चित्र आहे, अशी बोचरी टीका माजी खासदार निलेश राणे यांनीही केली.
शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापुर व नाणार प्रकल्पाला जर लोकांचे समर्थन असेल तर विचार करू असं बोलल्यानंतर मागून आलेल्या शिवसैनिकांनी त्यांना फटकारले. ही इज्जत एका निष्ठावंत शिवसैनिकाला आजच्या शिवसेनेमध्ये मिळते. ज्याच्याकडे गांधीजी तोच खरा शिवसैनिक हे आज शिवसेनेत चित्र आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 24, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला