संघाची विचारधार जाणून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो – नितेश राणे

Nitesh Rane

सिंधुदुर्ग : नुकताच भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर नितेश राणे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतील एक फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. याबाबत आपण संघाची भूमिका आणि विचारधार जाणून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो,असे स्पष्टीकरण नितेश राणे यांनी दिले आहे.

ही बातमी पण वाचा:- नितेश राणेंच्या संघ कार्यक्रमातील उपस्थितीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

सोशल मिडीयावर आमदार नितेश राणे यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत नितेश राणे संघ शाखेत शिस्तपालनाचे धडे गिरवताना दिसत आहे. आतापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि संघावर का करणाऱ्या नितेश राणे यांनी संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर टीका केली होती. त्याबाबत बोलताना राणे यांनी आपण संघाची विचारधार समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. ज्या पक्षात प्रवेश कला त्याची ध्येयं-धोरणं, विचार जाणून घेतले, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, या फोटोवरुन सोशल मिडीयावर ट्रोल करणाऱ्यांनाही नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. ‘नितेश राणेंना ओळखणारे ट्रोल करणार नाहीत’, असं त्यांनी म्हटलं आहे.