
रत्नागिरी/प्रतिनिधी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्या वाटण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पाच लाख गोळ्या पुढील दोन दिवसात वितरित करायला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.
केंद्रीय आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम थर्टी ही गोळी कोरोना वायरस होऊ नये, म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे जाहीर केले आहे. या गोळीचा डोस लिमिटेड घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढते असे दिसून आले. ही गोळी घेतल्यानंतर शरीरात कोरोनाशी लढणाऱ्या एंटीबॉडी तयार होतात व कोरोना पासून आपोआप संरक्षण होते. आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यातील दहा लाख गोळ्या वाटण्याचा निर्णय घेतला असून यातील पाच लाख गोळ्या पुढील दोन दिवसात वितरित होत आहेत, उर्वरित पाच लाख गोळ्या लवकरच दाखल होतील.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला