कोरोनातही राजकारण झाल्यास आम्ही ते सहन करणार नाही – नितेश राणे

नितेश राणेंचा जिल्हाधिका-यांना दम, कोरोनावरून राजकारण तापलं

nitesh rane

सिंधुदुर्ग : राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. प्रवासाची मुभा असल्याने आता ही साथ गावखेड्यातही जाऊन धडकली आहे. परंतु त्या मानाने कोरोनाचे रुग्ण हाताळण्यासाठी सर्वच शहरात व्यवस्था नाही. याच मुद्द्यावरून नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिका-यांना दम दिला आहे.

कोरोना संदर्भातील टेस्टिंग लॅबचं राजकारण न करता जिल्हा प्रशासनाने लोकाभिमुख काम करावे. लोकांच्या जीवाशी खेळू नये. टेस्टिंग लॅब जिल्ह्यात झालीच पाहिजे. जिल्हा प्रशासनाने राजकारण न करता जिल्ह्याच्या आरोग्याचा विचार करावा. असे न झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

लॅबसाठी लागणारी मशिनरी आणि मनुष्यबळ आपल्याकडे आहे. तुम्ही कुठेही लॅब सुरू करा मी मशिनरी देतो, असेही नितेश राणे म्हणाले.

कुठेही करा पण करोना टेस्टिंग लॅब जिल्ह्यात झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि यात राजकारण झाल्यास आम्ही ते सहन करणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

राणे म्हणाले, आमच्या मालकीचे पडवे येथील हॉस्पिटल सुसज्ज असून टेस्टिंग लॅबसाठी हॉस्पिटलला विचारणा करण्यात आली होती. तिथे पाहणीही झाली आणि नंतर सुविधा मिळणार नाहीत, असे सांगून या विषयी केवळ राजकारण केले गेले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER