वरुण सरदेसाईंच्या सुरक्षा व्यवस्थेवरुन आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Varun Sardesai - Uddhav Thackeray - Nitesh Rane

मुंबई : राज्य सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), भाजप (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. तर राज्य सरकारमधील काही मंत्री, त्यांचे कुटुंबिय यांच्यासह युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांना एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे. त्यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधला .

सरदेसाईंच्या मुलाला सुरक्षा देऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचं आणि योग्य पाऊल उचललं आहे. त्याला जास्त सुरक्षेची नितांत गरज होती. कारण त्याने मंत्रालयातील अनेक फाईल्स दाबून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक नोकरशाह त्याच्यावर नाराज आणि संतापलेले आहे. त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची खऱ्या अर्थाने गरज होती, असे ट्वीट करत नितेश राणे यांनी सरकारच्या सुरक्षाव्यवस्थेतील बदलांवरुन टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER