सर्व काही वाईट घडत आहे, पणवतीचे बाप हेच आहेत; नितेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात अनेक नैसर्गिक संकटे आल्याचे दिसून आले. २०२० साली निसर्ग चक्रीवादळाने थैमान घालत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचा सर्वांत  जास्त फटका कोकणाला बसला होता. या वादळाने झालेले नुकसान भरून नाही येत तोच कोरोना महामारीने मोठे संकट उभे केले. सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे आजही कोरोनाचा धोका कायम आहे. अशातच आता अरबी समुद्रात आलेल्या तौत्के चक्रीवादळाने समुद्रकिनारपट्टी भागात मोठे नुकसान केले आहे.  यावरून भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मिस्कील टीका केली.

‘उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दोन वर्षे झालीत, पहिले चक्रीवादळ २०२०ला, दुसरे चक्रीवादळ २०२१ ला आले. २०२० ते २०२१ सालात कोविड मृत्युसंख्येत क्रमांक-१ वरच, पिक्चर सुरूच आहे. कथा सुरूच आहे, सर्व काही वाईट घडत आहे, पणवतीचे बाप आहेत हे बॉस. ’ असे म्हणत नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button