ठाकरे सरकार ‘जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे का? नितेश राणेंचा सवाल

Nitesh Rane- uddhav govt

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट (Corona Crises) आहे. तर दुसरीकडे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने वातावरण चांगलेच तापले . राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती झाली आहे. मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ही मेगा भरती का करण्यात आली असा सवाल भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला आहेत.

ही बातमी पण वाचा:- ठाकरे सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा ;  छत्रपती संभाजी राजेंची टीका

नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की ,‘जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ??? आगीत तेल टाकत आहात. जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का??’ असा थेट सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, सरकारच्या या मेगा भरती निर्णयावर राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारवर टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER