संजय राऊत यांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा ; नितेश राणेंचा दावा

Sanjay Raut - ED - Nitesh Rane

हिंगोली : ईडीने (ED) शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावर मनी लॉंडरिंग प्रकरणी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीच्या नोटिसा आल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. ते हिंगोलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असताना याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची माझी माहिती आहे, असे नितेश राणे म्हणाले .

महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) वर्षपूर्तीनिमित्त संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवरूनही राणे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला.

प्रताप सरनाईक यांना ईडीकडून नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी सरनाईक यांची पाठराखण करत ईडीच्या कारवाईवर वेळोवेळी टीका केली आहे. यावर बोलताना, संजय राऊतांच्या नातेवाईकांना नोटिसा मिळाल्यामुळेच ते जास्त फडफड करत आहेत. तसेच, ईडीच्या कारवाईमुळेच राऊत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नव्हते ना? अशीही मला शंका आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER