‘हे सरकार नाही, सर्कस आहे!’ नितेश राणेंची महाविकास आघाडीवर टीका

मुंबई :- भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. हे सरकार नाही तर सर्कस आहे, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून आणि त्यामुळे महाविकास आघाडीत दिसून आलेल्या असमन्वयावरून राणे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय? डीसीपीच्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते? मात्र काँग्रेसचे महसूल आणि पीडब्ल्यूडी मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई?

हे खरंच सरकार नाही सर्कस आहे!- असे ट्विट करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न सांगता २ जुलै रोजी मुंबईमधल्या १० पोलीस उपायुक्तांच्या करण्यात आलेल्या बदल्या रविवारी गृह विभागाने तडकाफडकी रद्द केल्या. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गृह विभागाने या बदल्या रद्द केल्या, असे म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER