निसर्गाने नटलेला ‘वेळणेश्वर’ ….

velneshwar

तुम्हाला समुद्रकिनाऱ्याची आवड आहे?? निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा आहे?? तर मघ वेळनेश्वर समुद्रकिनारा तुमच्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे. वेळनेश्वर हे महाराष्ट्रातील रत्नागिरीहून सुमारे १७० किमी दूर स्थित एक गाव आहे. येथील समुद्र तटामुळे या जागेचे नाव वेळनेश्वर पडले. मंदिर आणि समुद्र तट असलेले हे गाव स्वच्छ, सुंदर आणि रमणीय आहे. येथील तट नारळाच्या झाडांनी भरलेले आहे. त्यात पाहणाऱ्यास समुद्राचा पाणी अत्यंत सुंदर दिसतो. हा बीच बराच मोठा असून कमी गर्दी असल्यामुळे येथे अगदी शांत आणि आनंददायी वातावरण असतं. तटाजवळ महादेवाचे जुने मंदिर आहे. हे मंदिर सुमारे १७०० वर्षांपूर्वीचे असून या मंदिराचा शैव धर्माच्या रहस्यवादाने संबंधित आहे. स्विमिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण उत्तम आहे. तुम्ही येथील तटावर स्विमिंग करू शकता. याशिवाय मोटर बोटचाही आनंद घेऊ शकता.

येथे पोहोचण्यासाठी वेळनेश्वर येथून जवळीक विमानस्थळ मुंबई असून येथून दुरी २९० किमी तसेच पुण्याहून ३०६ किमी दुरीवर आहे. मुंबईव्यतिरिक्त सर्व मोठ्या शहरांपासून बस व टॅक्सी घेऊन येथे पोहचू शकता. पुण्याहून खेड- सुरुर- सातारा- उबंरेज- कुंभारी घाट- चिपळूण-गुहागर ते वेळनेश्वर पोहचू शकता. गुहागर ते वेळनेश्वरची दुरी १६ किमी आहे. येथून जवळीक रेल्वे स्थानक चिपळूण  आहे. जे वेळनेश्वरहून ६० किमी दुरीवर स्थित आहे. वेळणेश्वर येथील निसर्ग अगदी मनाला प्रसन्न करणारा आहे. येथील हिरवेगार झाड आणि पश्चिम घाटाच्या वळणामुळे एकाने लक्ष आकर्षीत करण्यासाठी वेळनेश्वर समुद्रकिनारा पुरेसे आहे. अशा या निसर्ग समृद्ध ठिकाणाला सर्वांनी एकदा तरी अवश्य भेट द्यायला हवीच!