‘निसर्ग’ मुंबईत धडकणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हाधिका-यांच्या संपर्कात

Nisarga Cyclone - CM Uddhav Thackeray

मुंबई : निसर्ग चक्रीवादळ अलिबाग येथे धडकले असून झाडं कोसळली. घराचे छप्पर, स्टेट बॅंकेच्या छताची पत्रे उडाली. काही तासांतच हे वादळ मुंबईत धडकणार आहे. मुंबईत मोठ्या नुकसानाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत या वादळाच्या प्रभावाने नरीमन पॉइंट भागातील झाडे कोसळली आहेत. मुंबईत यंत्रणा सतर्क असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हाधिका-यांच्या संपर्कात आहेत.

ही बातमी पण वाचा : .. असा मुख्यमंत्री दुसरा कुणी नसेल ! ; अभिनेता अर्षद वारसीकडून उद्धव ठाकरेंचे कौतुक

चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री आढावा घेत आहेत. मुंबई मनपा आयुक्तांनी किनारपट्टी भागाची पाहणी केली आहे. ते वर्सोवा किना-यावर जाणार आहेत. तेथील निवारा केंद्राला भेट देणार आहेत. वादळाचा धोका लक्षात घेऊन किना-यालगत राहणा-या रहिवाशांची बीएमसीच्या ३५ शाळांमध्ये तात्पुरत्या निवा-याची सोय केली आहे.

मुंबईत एनडीआरएफच्या टीम तैनात आहेत. वांद्रे वरळी सी लिंकवर पुढचे काही काळ वाहतूक बंद आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला. निसर्गचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER