‘अभी ज़रा बाज़ आएँ’, मोफत लसीकरणाच्या श्रेयावरून निरुपमांनी राष्ट्रवादीला खडसावले

Maharashtra Today

मुंबई : केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार राज्यभरात १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. या या लसीकरणाच्या श्रेयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम ( Sanjay Nirupam) यांनी तर राष्ट्रवादीला थेट अभी जरा बाज आए, असा इशारा दिला आहे. तसेच राष्ट्रवादीने मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करणं कितपत योग्य (Nirupam lashes out at NCP over ‘free vaccination’) आहे, असा सवालही केला आहे.

संजय निरुपम यांनी ट्विट करून राष्ट्रवादीच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केला आहे. राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे आणि मोफत लसीकरण करण्याची घोषणा एकट्या राष्ट्रवादीकडून केली जात आहे. थोडसं वेगळं वाटतंय. मोफत लसीकरणाचा निर्णय योग्य आहे. पण त्याची घोषणा सरकार करणार की केवळ एक मित्र पक्ष करणार? भीषण महामारीत क्रेडिट घेण्याचं राजकारण अत्यंत वाईट आहे. राष्ट्रवादीने असे प्रकार करू नयेत, अभी ज़रा बाज़ आएँ।, अशी टीका निरुपम यांनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारच्या निर्णयाचं श्रेय घेतलं जात असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे. निरुपम यांनी थेट राष्ट्रवादीला नाव घेऊनच टीका केल्याने आता राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

ही बातमी पण वाचा : मोफत लस देण्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी ; राष्ट्रवादीच्या घोषणेने मतभेद ? 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button