राहुल गांधीच काँग्रेसला तारतील : संजय निरूपम

मुंबई :- राहुल गांधी हेच काँग्रेस पक्षाला वाचवू शकतात, असे काँग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम यांनी म्हटले आहे.
काँग्रेसला वर आणण्यासाठी लोकशाही पद्धतीने पक्षाचा अध्यक्ष निवडला पाहिजे असे मत माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय निरूपम भडकले. गांधी परिवाराशिवाय कुणीही नेता सध्या काँग्रेसचे नेतृत्व करू शकत नाही, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.

मनसेने काढली वारिस पठाणची अंतयात्रा

दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी खासदार संदीप दीक्षित यांनी काँग्रेसला अजून अध्यक्ष मिळत नाही? असा सवाल आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना केला आहे. काही वरिष्ठ नेत्यांना काही होऊच नये, असे वाटते, असा आरोपही दीक्षित यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय निरूपम चिडून म्हणाले, राहुल गांधी हेच काँग्रेस पक्षाचे एकमेव नेते आहेत!